शब्द बोलले होते
शब्द बोलले होते
जळताना सरपणावर शब्द बोलले होते,
देखिता प्रतिबिंब शब्दांचे तोलले होते ...
सत्याची वाच्यता नकोच कुणालाही,
मी लिहीले तर अग्नीद्वंद झाले होते...
मुखवट्याचे बोलबाले खोट्यांची चर्चा,
घास कडू सत्यांचा बेचव जमाने होते...
लपवून घेतला मी आणलेला गुलाब,
मार्गात तुझ्या कळ्यांचे गालीचे होते...
मागणी घालायला पाहीजे होती तुला,
तुला न कळले गुपीत सारे गैर होते...
शेवटचा रकाना रिकामा तुजसाठी ,
तुझे येणे जाण्याने जीवन रिकामेच होते...
अस्तित्व चाचपळतोय तुझ्या वाटेवरी,
ठसे पाउलांचे पावसांत मिसळले होते...
आताही तिथेच उभा दिपस्तंभाजवळ,
माझ्या जीवनाचे दिप केव्हाच मालवले होते...
