शौर्य संभाजीराजेंचे
शौर्य संभाजीराजेंचे
छावा तो शिवबाचा
तेजस्वी जणू सूर्यच होता
महापराक्रमी अन् रयतेचा राजा
सईबाईचा पुञ होता
लहापणीच पोरका झाला
जिजाऊंच्या छञाखाली आला
संस्कृतपंडित शंभू जाहला
अलंकृत 'बुधभूषण'रचला
कोकण साम्राज्यात घेतला
येसूबाईंशी विवाह केला
महाप्रतापी शंभू राजा
भगवा मानाने फडफडला
कट कारस्थानांना बळी पडला
आप्तांनीच गळा कापला
अविश्वासाचा मारा झाला
तरी छावा नाही डगमगला
शञूने तव डाव रचला
औरंगजेबाच्या मगरमिठीत गेला
तेजस्वी नेञांना मुकला
तरी नाही सोडली निष्ठा
तन राहिले चर्माविना
तलवारीने कापली जिव्हा
पाहणा-यांचा जीव तळमळला
पण औरंगजेबाला ना पाझर फुटला
क्रुरपणाने गाठली सीमा
छाव्याचा शिरच्छेद केला
अंतःपर्यंत ना झुकला
कोटी नमन शंभूराजाला
