शौर्य --- साहस
शौर्य --- साहस
शिवरायांचे शौर्य -- साहस ताकदीचे
अभिमानास्पद आहे साऱ्या जगाला
गनिमी काव्याने शत्रूशी लढण्याचे त्यांचे सामर्थ्य
आजही गौरवास्पद वाटते मनामनाला १
मनाचा खंबीरपणा,आत्मविश्वास माणसाला
वेगवेगळी शौर्य-- साहस करायला शिकवते
कोणत्याही गोष्टीचा विचाराने केलेला दृढनिश्चय
संस्कारांच्या शिदोरीतून माणसाचे जीवन घडवते २
सुश्मीता सेन,कल्पना चावला या वीरांगना
संकटांवर मात करून शौर्य-साहस दाखवणाऱ्या नारी
सुवर्णाक्षरांनी त्यांचे नाव कोरून
साऱ्या जगाला दाखवली कामगिरी भारी ३
सावित्रीबाईंच्या लेखणीचे साहस मात्र
सर्व स्त्रियांच्या उद्धाराचे ठरले
स्वातंत्र्य संग्रामातील शूरवीरांचे शौर्य
देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले ४
सावरकरांची तळपणारी साहसी लेखणी
अंदमानात शौर्यगाथांनी भरली
त्यांची क्रांतिकारी विचारांची गाणी
देशाच्या इतिहासात शिरपेच ठरली ५
अशा क्रांतिकारकांच्या शौर्य -- साहसानेच
देशाने स्वातंत्र्याची चैतन्यदायी पहाट पाहिली
सध्या नवीन तंत्रज्ञानाच्या विलक्षण प्रगतीनेच
शिक्षणाची पाऊलवाट साहसाने तेजाकडे चालली ६
