STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

शौर्य साहस......!

शौर्य साहस......!

1 min
308

शौर्य साहस 

समान अर्थी शब्द

करतात कधी कधी

निशब्द....

शौर्य दिसते

रणांगणात

साहस वसते

निर्णयात....

दोहोंची परिणीती

होता एकरूप

अकल्पित होते

कार्य सिद्धी...

म्हणून असावे

शौर्य मनगटात

आणि

साहस हे मनात..

जेणे 

कार्य सिद्धी

होई हो

क्षणात.....

त्रिकालातीत सत्य

शौर्य साहस

असता अंगीभूत

कर्तृत्व झाळाळते

विश्वात...

जेणे

उज्वल उन्नत

यश पडते पदरात

कीर्ती संपन्नता लाभते

जीवनात.....!



Rate this content
Log in