STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

4  

.प्रमोद घाटोळ

Others

शौर्य साहस

शौर्य साहस

1 min
120

शौर्याला मित्र बनूनी

चढून जाऊ उंच गिरी

साहसाने चालत जाता

संकट पळते दूरवरी


बाहूमध्ये अफाट शक्ती

का व्हावे मग खाटकरी?

नेटाने कष्टत राहावे

धरुन बसू नये हात घरी


कर्मामध्ये नशिब लपलेले

व्यर्थ विसंबू नये दैवावरी

पंगू ही समुद्र लांघतो

धैर्य बांधता मिळे हरी


शौर्य साहस अमुल्य ठेवा

होऊ तयांचे धुरकरी

या गुणांची करता शेती

मोती पिकते बांधावरी



Rate this content
Log in