STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

शाप गरीबीचा

शाप गरीबीचा

1 min
187

जन्म घेणे नाही हाती

दैवदत्त लाभतसे

मोठा शाप गरीबीचा

जन्मतःच मिळतसे    (१)


चणचण सगळ्याची

चिडचिड नेहमीच

रक्तवर्ण ही कमळे

येती चिखलामधीच    (२)


नसे कौतुक , ना लाड

मनी कष्टी हो माऊली

नशीबचि येते आड

गर्द दारिद्रय सावली    (३)


बुद्धिमान अपत्यांनी

केले युद्ध संकटांशी

अग्रक्रम शिक्षणासी

झुंजूनिया गरीबीशी    (४)


झळकून गुणवत्ता 

झाले अग्रमानांकित

दर्जा जनमानसात

उच्चभ्रूंच्या पंगतीत    (५)


साहित्याला गुण द्या
लॉग इन