सहानुभूती नक्कीच हवी
सहानुभूती नक्कीच हवी
1 min
320
निसर्ग कोपला की
माणूस त्रस्त होतो
पाऊस कमी पडता
कोरडा दुष्काळ पडतो
अतिवृष्टी होते नि
ओला दुष्काळ पडतो..
परिस्थिती दोन्ही अशी
गंभीरच ती असते
अडचणीत वेळीच
मदतीची गरज असते
खेडो-पाडी, शेत शिवारी
हतबल होतो शेतकरी
दुष्काळ ओला पडो वा
कोरडा दुष्काळ तरी
मदतीची त्यास गरज खरी
सर्वथरावर जाणीव असावी
दुष्काळग्रस्ता मदत करावी
चर्चा नुसतीच ती नसावी
सहानुभूती नक्कीच असावी
