शांती ब्रम्ह
शांती ब्रम्ह
भानुदासाचियां ! कुळात हे रत्न !
संत ते महान ! एकनाथ ||१||
शके पंधराशे ! तेहत्तीशी जन्मं !
सूर्यवंशी नाम ! चतुर्वर्णी ||२||
सूर्याचा तो वंश ! जन्मं पैठणास !
कांती तेजास ! नं वर्णवे ||३||
करुनि नमन ! गुरूं जनार्दना !
सेवा भाव जाणा ! तयाचिया ||४||
सर्वंथा संस्कार ! द्विज वर्णी म्हणा !
अवगत जाणा ! शास्त्र विद्या ||५||
वेद विद्या सर्वं ! होई पारंगत !
जना उपदेश ! तेचि करी ||६||
पुस्तके अपार! भागवत सारं !
रामायण दारं! संस्कृतीचे ||७||
अभंगादी सर्वं ! भारुडे करुनि !
उपदेश मनी ! जना करी ||८||
ज्ञानेश्वरा कंठी ! अजाणवृक्ष मुळी !
लागता जवळी ! जाये तया ||९||
मुळी ते काढुनी ! शुद्ध तेचि केली !
ज्ञानेश्वरी भली ! जना देत ||१०||
ग्रंथ हे काढुनी ! जना बोध केला !
आत्मा निर्वाळला ! नाथ षष्ठी ||११||
संतदास म्हणे ! शान्ति ब्रम्ह झाले !
काम घरातले ! कृष्ण करी ||१२||
