शांत
शांत
1 min
12.1K
सगळं शांत झालय, फक्त तुझी चर्चा आहे.
भंग शांतता करण्या, डोळे वाट तुझी पाहे.
सरते शेवटी शर्यत आयुष्याची, पल्ला गाठूनी मुक्ती.
जानते पणी आयुष्याला, जगण्याची कसली सक्ती.
सक्ती नव्हे कर्तव्य, आपल्याच लोकांसाठी.
विरोध थोडासा, त्रास देणाऱ्या माठासाठी.
प्रतिकार तो करायचा, प्रत्येक संकटाचा.
फल प्राप्ती मिळण्या, भेद कपटकांचा.
पाहण्या बाकी खुप होते, राहून गेले सर्व.
या वळणावर अवनीवरती, शांत संपून गेले एक पर्व.