शाळेतील आठवणी
शाळेतील आठवणी
शाळेत जायचा येई मला नेहमीच कंटाळा
वाटे मज मनासी खूप पाऊस पडून शाळेला बसावे टाळा
शिक्षक भासती हिटलरप्रमाणे असे त्यांचा खूप दरारा
Maths चे प्रॉब्लेम्स सोडवता सोडवता फुटती घामाच्या धारा
History ची असायची वेगळीच मिस्टरी
Science लॅब आणि माझी वेगळीच Chemistry
या दोन टीचर्सचा माझ्यावर जीव फार
परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले की चॉकलेट्स द्यायचे दोन चार...
एक वेगळीच आवड होती English, मराठीची
कारण लहानपणापासून मला आवड होती कवितेची
Geography च्या तासाला घडे दुनियेची सफर
Globe वरती देश शोधायला आवडे वरच्या वर...
Break मध्ये फ्रेंड्ससोबत टिफिन खाण्याची वेगळीच मज्जा
तरीही वाटे exam नंतर कधी पडतील रजा
होते माझे फ्रेंड्स आणि शाळा माझी न्यारी
कितीही मोठे झाले मी तरी मला वाटे ती आजही प्यारी...
