"शाळेला गड्या जायाच "
"शाळेला गड्या जायाच "
दगडाची काळी पाटी अन् लाकडी चौकट जोडीला पांढरी पेन्सिल असायची
मुकाट्यान पाई शाळेला गड्या पोर जायाची I
कापडाची थैली कुरदाण्यात भाकरी अन् हिरवी मिरची असायची
मातीवर पगंत बसायची जोडीला पोरपोरी असायची मुकाटाण्या गड्या पोर शाळेला जायाची ।
जुन्या पुस्तकाला कव्हर कागदाच घालायच जोडीला .
जुन्या कागदाच्या वह्या असायच्या मुकाटाण्या गड्या पोर शाळेला जायाची ।
पितळी थाळीची घंटा शाळेची वाजायची
विना चप्पल पोर पोरी पळायची जोडीला पांढरा सदरा अन् खाकी पॅन्ट असायची
मुकाटाण्या गड्या पोर शाळेला जायाची।
मास्तर चा धाक अभ्यासाला वाक बापाची करडी नजर असायची
जोडीला गुरुजी ची छडी असायची मुकाटाण्या गड्या पोर शाळेला जायाची।
कौलारु शाळा दगडी इमारत असायची शेणान शाळा सारवायची
जोडीला पोर पोरी सारीच सारायची मुकाटाण्या गड्या पोर शाळेला जायाची।
