शाळेची अवस्था
शाळेची अवस्था
1 min
182
मंदिराचे कळस गगनाला भिडले,
शाळेचे बांधकाम देणगी वाचून राहीले,
दुधाचा अभिषेक दगडाच्या देवाला,
शापोआ नुसताच नावाला,
देवाचा दरवाजा चांदीने मढला,
शाळेचा दरवाजा पाण्याने सडला,
मंदिरात जाऊन लोक पोथी पुराण वाचतात, शाळेच्या ग्रंथालयात उंदीर नाचतात,
मंदिराच्या दानपेटीत गुप्त दान करतात, शाळेच्या देणगीची पावतीच मागतात,
