शाळेची आठवण
शाळेची आठवण
मजाच निराळी होती ती
शाळेतल्या दिवसांची
एक वेगळीच दुनिया होती
माझ्या सख्या सोबतींची।।१।।
चिंता काळजी काहीच नव्हती
परीक्षेत मिळणाऱ्या गुणांची
दंगामस्ती करता करता
सवय होती अभ्यासाची।।२।।
धाक असला बाईंचा
तरी मनात आदर असायचा
छडी दिसताच बाईंची
वर्ग चिडीचूप व्हायचा।।३।।
जेवणाची सुट्टी होताच
एक आरोळी ठोकायची
एकत्र डबा खाताना
जेवणाची पंगत रंगायची।।४।।
कट्टी बट्टी तर रोजचीच होती
पण द्वेषाला जागा नसायची
कितीही भांडणे होवोत पण
मैत्री पुन्हा सोबत हसायची।।५।।
क्षण आठवणींच्या कुपीतले
असतात शाळेतील दिवसांचे
प्रत्येकालाच सोनेरी वाटतात
दिवस आपल्या शाळेचे।।६।।