शाळेचा जुना रस्ता
शाळेचा जुना रस्ता
1 min
223
तोच जुना रस्ता
पुन्हा नव्याने भासतो
शाळेची ती आठवण
का नव्याने जागवतो?।।
मी आणि रस्ता
नव्हते दुसरे कोणी
पावसाची श्रावणी सर
झाली आमुची पाहुणी।।।
सायकलशी जुळली नाळ
मिळाली नवी सखी
शिक्षणाच्या प्रवासात लाभलेली
मैत्रीण होती ती मुकी।।
तोच जुना रस्ता
स्वप्नात येतो रात्री
म्हणतो मला कसा
आठवण येते का जरातरी?।।
