शाळा
शाळा
1 min
117
एवढ्यात कुठे व्हयाची नवी सुरवात
कुठे गेले ते दिवस आज
शांतता पसरली आहे सगळीकडे
ना किलबिल आवाज मुलाचा
ना घन घन घंटेचा
ना मैदानी खेळाचं
ना शिकवणीचा
सगळीकडे पसरली आहे ती फक्त शांतता
काही तासा साठी गजबजणारी शाळा
आज एकाकी पडली
वाट पाहते आहे ती मुलांची
आपल्या कवेत घेण्यासाठी
