शाळा प्रवेशोत्सव गीत
शाळा प्रवेशोत्सव गीत
श्रीगणेशा नवीन शैक्षणिक वर्षांचा
प्रवेशोत्सव आनंदाने साजरा करण्याचा
विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पहाण्याचा
उत्सवच जणू प्रत्येक हा शाळेशाळेचा
सुट्टी संपून झाली शाळा ही सुरू
लगबगीने शाळेची तयारी करू
पहिल्याच दिवशी उपस्थित राहू
सर्वांचे स्वागत हास्याने करू
दारोदारी सुंदर रांगोळी सजेल
तोरण -पताकांनी शाळा नटेल
सुमनांचा सुगंध हा दरवळेल
हत्ती- घोड्यावरून मिरवणूक निघेल
पहिल्याच दिवशी मोफत वस्तू देऊ
शाळेची त्यांना आपण गोडी लावू
शालेय पोषण पूरक आहार देऊ
मुलांचे आरोग्य निरामय ठेवू
आनंदाने येतील मुले शाळेला
विसरतील आपल्या घराघराला
असे पोषक वातावरण निर्माण करू
ज्ञानरचनावाद आपण समजून घेऊ
