शाळा (चित्रकाव्य)
शाळा (चित्रकाव्य)
शाळा आहे ज्ञानाचे भांडार
शाळेमध्ये वाढतो आपला व्यवहार
जगाचे ज्ञान, शाळेत मिळते
नोकरीही शिकल्यानेच मिळते//१//
माणसाला वळण लावते शाळा
गणित शिकवितो, बोर्ड काळा
गुरुजन लावतात, विद्यार्थ्यास लळा
शाळेत भरतो,बाळगोपाळांचा मेळा//२//
वेळेवर वाजते, शाळेची घंटी
शाळेला असते, रविवारी सुटी
शाळा जगण्याला, देते दिशा
शाळेत कळतो, जगाचा नकाशा//३//
शाळा शिकविते, अनेक भाषा
चुकले काही तर, गुरुजी करतात शिक्षा
मनात भरते, बालपणीची शाळा
शाळा म्हणजे, आनंदाचा सोहळा//४//
शाळेला दांडी, मारू नये
ज्ञानाची घडी, मोडू नये
शाळेत करावा, गुरुजनांचा आदर
गुण चांगले, करावे सादर
भरून घ्यावी, ज्ञानाची घागर//५//
