STORYMIRROR

Chaitali Ganu

Others

3  

Chaitali Ganu

Others

शाई कागदाचा आत्मा

शाई कागदाचा आत्मा

1 min
463

आत्मा शाईचा

आत्मा कागदाचा

तरीही शरीर मात्र शब्दांचंच....


रंग शाईचा

रंग कागदाचा

पण उधळण मात्र शब्दांचीच...


ती शाई

तो कागद

पण त्यांचं

अस्तिव भरून उरत शब्दातच....


ती काळी

तो पांढरा

जातीपातीच्या सीमाना

ओलांडायला मदत शब्दांचीच...


अशा या शाई नी कागदाचा आत्मा

म्हणजे नुसते शब्द नाहीत

शरीर सोडून गेले जरी एका शाई पेनातुन

तरी दुसऱ्या कागदावर उतरवले जातात

वेगळ्या शाईने

लिहिणाऱ्याचा आत्मा बनून....


Rate this content
Log in