शाबुवडा चटणी
शाबुवडा चटणी
1 min
258
शाबू आणला बाजारामधून
संगतीला त्याच्या बटाटा !!
शाबू वडा आज करेल म्हणते
अगदी मस्त चटपटा !!
मिरची कोथिंबीर जिरे
मिळवेन चवीपुरते मीठ!!
सगळे एकत्र करून
बनवेन मस्त पीठ!!
भिजवून घेतला शाबू
शिजवून घेतला बटाटा!!
एकत्र करून पीठ मळले
सोबत वडा बनवला फटाफटा!!
तळून घेतला वडा
लागे खुसखुशीत खमंग!!
अजून दोन घेऊन खाऊ
जिभेवर उठलेले तरंग!!
सोबत चटणी फक्कड
आंबट तिखट आणि गोड!!
नारळाची चव भारी
नाही तिला कशाची जोड!!
