STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

सगुण

सगुण

1 min
244

पाट्याच्या जात्यावरी,दळण दळते ती

संसाराच्या ताव्यावरी,सगुण पाहते ती।।धृ।।


मीठ भाकरीची भांत,मोल मजुरी सुखांत

संसाराच्या वेलीवरी,कोल्ड्यास शोधते ती।।


दादा गेला तो शिवारी,ताई गेली ती बाजारी

शिवाच्या जीवावरी, भाकरी शेकते ती।।


दाना दाना पसा पसा,जमा होई जसा जसा

जीवाच्या भावावरी,सरवा वेचते ती।।


दांडीची चोळी लुगडी, दांडीची जुनी घोंगडी

शेला पागोट्यावरी,चिंत्रग रेखते ती।।


बेसन भाकरी ठेचा,कांदा मुळा अहो चाचा

नशिबाच्या जोरावरी,जीवन जगते ती।।


सरव्याची सरावी ती,गोठ्याला गरीबी ती

गोष्टींच्या कथावरी,श्रीमती शोधते ती।।


जपुन ठेवि लुगडी,धोतर घडीचे घडी

कुंकाच्या डबल्यावरी,बांशिग बांधते ती।।


Rate this content
Log in