सेवानिवृत्त ग्रंथपाल
सेवानिवृत्त ग्रंथपाल
एक काळ होता, मित्रांनो,
वाचक,ग्रंथ,रांगेतल्या कपाटानों,
सहकारी,मित्र सारे, वर्तमानपत्रे,
पाक्षिक, साप्ताहिक,मासिकानों,
काळ सरकला पूढे,आणि,या शांत,
निरामय,आनंदी जिवनातुन,
वेगळा झालो,ग्रंथपाल सेवेतून निवृत्त झालो.
आपल्या आठवणी शिवाय,
हाती आज काही नाही,
आणि आपली आठवणच कधी,
जगण्याला साथ देते,आणि,
पोट भरण्याला अर्थ देते.
कारण ग्रंथपाल म्हणून,
सेवानिवृत्त झालो मी.
विद्यार्थी,शिक्षक,वाचक,सारा,
प्राचार्य,कार्यालय, ग्रंथालय,
यांच्यातला होतो मी ,ग्रंथपाल,
आज काळ आणि वेळ सारेच,
वेगाने पुढे जात आहेत,
मला तरी काय माहित अजुन,
पूढे काय घडणार आहे ?
एवढे तुम्ही प्रेम दिलेत,
आज थोडा वेगळा झालो,
ग्रंथपाल सेवेतून निवृत्त झालो.
पापण्याखाली आश्रू दडतच नाहीत,
आणि गालावर, आल्याशिवाय राहत नाहीत ,
कधी आले,कळत नाहीत,
कारण कपाटाच्या रांगेतले,वाचक,
आज दिसत नाहीत.
