सेवा आई वडिलांची
सेवा आई वडिलांची
1 min
225
सेवा निःस्वार्थ मनाची
आस नसावी धनाची
सेवा आई वडीलाची
घडो हातून मुलाची. //१//
काठी व्हा रे आंधळ्याची
द्यावी साथ स्वबळाची
करा मदत तयांना
सेवा निःस्वार्थ मनाची //२//
सेवा निःस्वार्थ मनाची
अन्न द्यावं भूकेल्याला
कोणी नसावे उपाशी
जगवावे गरिबाला //३//
सेवा निःस्वार्थ मनाची
जशी सावित्री बाईची
दुबल्यांच्या साठी. केली
स्वतः होळी आयुष्याची. //४//
सेवा केली समाजाची
दीन दुबळ्या जणांची
पर्वा केली ना स्वतःची
सेवा निस्वार्थ मनाची //५//
सेवा निःस्वार्थ मनाची
केली सेवा अपंगांची
नव जीवन मिळालं
खरी पुण्याई बाबांची //६//
