सेल्फी ....
सेल्फी ....
सेल्फी म्हणजे स्वताच प्रतिबिब काढणे .....
तेही कधी तोंड करून हसरे तर कधी वेडेवाकडे ......
एकदा सेल्फी काढली कि ती स्टोर होते ....
मोबाईलच्या गॅलरी मध्ये उठून दिसते ...
आपण पण आपल्या जीवनात कित्येकदा मोबाईल विना सेल्फी काढतो ....
आपल्या स्वभावाने वागण्याने कित्येकांच्या मनात आपली सेल्फी आपण स्टोर करतो
कधी वाईट सेल्फी कधी प्रेमळ कधी रागीट तर कधी हसरी .....
प्रत्येक सेल्फी मनात ठसते तर कधी मनात खुपते ....
ह्या सेल्फी ला नाही लागत फ्रंट कॅमेरा
नाही कुठली सेल्फी स्टिक
एकदा आवडली तर आवडली नाही तर नावडती बनते ....
