सद्गुरूवाणी
सद्गुरूवाणी
1 min
258
केल्याने होत नाही रे।
आधी तू केलेच पाहिजे ।।
मनाच्या मातीत नामाचे बीज।
आधी रुजवलेच पाहिजे।।
नामाचा महिमा अगाध आहे।
कलियुगी हेच रामबाण आहे।।
मायेच्या या सागरात।
सदगुरूच तारणहार आहेत।।
श्रवणाचे फळ मिळे तात्काळ ।
दोष होती सारे नष्ट समूळ।।
सद्गुरू सांगती ऐका जन सकळ।
काया वाचा मन होईल निर्मळ।।
भक्तिमार्गातील मुख्य चरण।
सदा असावे आपले सदाचरण।।
भवसागर हा पार करती।
सोडू नका सद्गुरू चरण।।
सद्गुरू सांगती निरुपणी।
परमार्थ साधावा प्रपंच नेटका करुनि।।
समय लावा सत्कारणी।
मोक्ष साधा जन हो ह्याच जन्मी।।
