सद्गुरू कृपा
सद्गुरू कृपा
१मार्च१९२२ रोजी रेवदंडा ग्रामी
पुण्यवान माता पितांच्या पोटी
दैवी बाळ जन्मले
आई वडिलांनी त्यांचे नारायण
असे नामकरण केले
शांत,प्रेमळ,धार्मिक वृत्ती
जन्मताच होती
धर्माधिकारी कुटूंबात देवभक्ती
मुळातचं होती
वंचितांना शिक्षित करून
त्यांची प्रगती केली
सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात
वेगळीच उंची गाठली
समर्थ रामदासांची शिकवण
घराघरात पोचवली
आध्यात्माची गोडी मनाला लावाली
परमार्थ आणि प्रपंच सांगितला नीट उलघडून
दासबोधाचा खरा अर्थ सांगितला नीट समजावून
बालभक्तीतून संस्कार करून
नवी पिढी घडवली
तरुणांनाही ही निरुपणातून
योग्य दिशा दाखवली
बैठकीच्या माध्यमातून माणसं जोडली
मानवता हा धर्म आणि माणुसकी ही जात
शिकवण सार्यांना शिकवली
सद्गुरू आणि शिष्या मधला संवाद त्यांनी उत्तम साधला
उपासना हा मोठा आश्रय मूलमंत्र त्यांनी दिला
या जन्मी जन्मूनी
सद्गुरू सेवा घडली
हे माझे भाग्य परम थोर
सद्गुरूंची कृपादृष्टी आणि आशीर्वाद
आम्हा बालकांवर राहो निरंतर