STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

सौन्दर्य आणि फॅशन..!

सौन्दर्य आणि फॅशन..!

1 min
345

निखळ सौन्दर्य हे

निसर्गाचे देणे असते

जे जळी काष्टी पाषाणी

सदैव आपोआप जाणवते...


सौन्दर्याची परिभाषा

करणे खरोखर अवघड असते

सौदर्याला त्या कोणती

ना सीमा असते...


सौन्दर्य मना मनाचे खरे

विविधतेने नटलेले असते

जे आतून उभारून येऊन

चेहऱ्यावर ओसंडून वाहते....


निर्मळ मन हेच खरे

सौन्दर्य आपले असते

ते कधीच कशाने

नाही डागाळते....


प्रसन्न मन सदैव असता

ते आपोआप खुलते

अवतीभवती सारे आसमंत

व्यापून ते राहते..


सौन्दर्याच्या तुलनेत

फॅशन खरोखर कच खाते

बेगडी सौन्दर्य प्रसाधनाचे

तेथे काही कार्य नसते....


फॅशन बिशन सारे झूट आहे

सौन्दर्य जीवनाचे खरे निर्मळतेत आहे

ही निर्मळ मनाची निर्मळता

हीच खरी चिरंजीव फॅशन आहे....!


Rate this content
Log in