सौंदर्य आणि फैशन
सौंदर्य आणि फैशन
1 min
283
फैशनच्या नावाखाली
सौंदर्याचे प्रदर्शन
कधी लाज - लज्जा सोडून
तर कधी शरीर सौष्ठव दाखवून
फैशन ही काळाची गरज
म्हणतो आजचा युवाजन
पण त्यासाठी विकतोयस कशाला
स्वतःची इज्जत डोळे झाकून???
फैशन आणि सौंदर्य
हे एकमेकांचे पूरक आहेत
इथे दिखाऊपणाला मिळते वाहवा
आणि साधेपणाला किंमत नाहीये
आजच्या फैशनने
सौंदर्यावर मिळवली मात
हरली सर्व मूल्ये अन् मते
शेवटी खरेपणाचा झाला घात
