Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vinita Kadam

Others

2.5  

Vinita Kadam

Others

सौख्याचे घरदार

सौख्याचे घरदार

1 min
355


सोनसळीच्या छटा पाहूनी

सोनचाफा दारी फुलला

शुभ्रतेच्या निळाई सम

श्वेत तगर सोबतीला....१


क्षितीजासंगे दशदिशा

ठाकी गंधवती स्वागताला

गोकर्ण ही अंगझटीला

लाजरा प्राजक्त दरवळला....२


मोहक गुलाब चौफेर

अव्यक्त अबोली मोहरली

जास्वंदीची खुलता लाली

परसदारीची बाग बहरली....३


सजले अंगण सजले

पाहूनी रविराज हसले

कोवळ्या उन्हात माझ्या

अंगणी दवबिंदू पहुडले....४


नटखट चंचल वात फिरे

अल्हड चमेलीचे वर्तन खोडकर

हरित तृणांच्या मखमालीस

आनंदाचा येई गहिवर.......५


जाई जुई मांडवाखाली

मोद भरे कृष्णकमळ

मध्यरात्री साधनस्थ

तपस्वी ते ब्रह्मकमळ.....६


सौख्याचे घरदार माझे

गंधित फुलांनी नटले

सप्तरंगी उधळण न्यारी

इंद्रधनूच अवतरले.......७


Rate this content
Log in