सौख्याचा शोध
सौख्याचा शोध
1 min
85
स्वतःसाठी जगताना
थोडं इतरांसाठीही जगावे
स्वतःच्या मनाप्रमाणे वागताना
थोडं समोरच्यालाही जाणावे
नाती असतात रेश्मासारखी
ती अलगद जपावी
असले हेवेदावे तरी दूर करून
नाती नेहमी टिकवावी
पैश्या पाठी धावता धावता
कुठेतरी क्षणभर थांबावं
आपल्या लोकांमध्ये
थोडा वेळ का होईना बसावं
प्रत्येक गोष्टीतून घ्यावा
आवश्यक असा बोध
तोच कामी येत मग
लागेल खऱ्या अर्थाने सौख्याचा शोध...
