सौदर्यं तुझे आरसपाणी...
सौदर्यं तुझे आरसपाणी...
चिंब भिजलीस तू हिरव्या माळरानी ,
वाहणारे पाण्याचे लोट गाते तुझी गाणी ,
श्वास लागला थरथरायला ऐकून तुझी वाणी ,
थेंबा थेंबात तुझी कांती सौदर्यं तुझे आरसपाणी ...
गारवा कुंतलांचा वाराही शहारल्यावानी ,
ओघळत्या सरी गाणार रुपाची गाणी ,
ओलीचिंब झाली बरसात ऐकून तुझी कहाणी ,
शब्दाविन बोलल्या जातील तु प्रित राणी ...
पावसाला बघ आली चमक मोत्यावाणी ,
स्पर्शिता तुला बेधूंद झाला मनी ,
पाहून तुजला मीही भिजलो या क्षणी ,
सावर या क्षणाला निसटत आहे ओंजळीतून पाणी ...
हसून थांबलो मी त्या वळणी ,
मन मंजीरी तु उभी छत्री घेऊनी ,
बरसू दे त्या मेघाला तहानलेली धरणी ,
तृप्त होईल येईल हिरवी जरी नेसूनी ...
