सैरभैर
सैरभैर
1 min
198
झाली सैरभैर नीलगाय
पळत सुटली घेऊनी चार पाय
विसरली ती तिचा अधिवास
फिरायली इकडे तिकडे घेण्यास घास
झाली ती अनियंत्रित
लोकं तिच्या मागे करण्यासाठी तिला नियंत्रित
त्यातच घुसली ती विकास चव्हाण यांच्या घरात
त्यांची एक वर्षाची मुलगी वैष्णवी जमिनीवर होती खेळत
तिच्या डोक्याजवळ चाळीस मिनिटे उभी राहिली नीलगाय
चव्हाण कुटुंबीयांना आले भय
टांगणीला लागला त्यांचा जीव
पण त्या जंगली मातेला आला तिचा कीव
अगोदर असलेली नीलगाय अशांत
अचानकच झाली तिथेे शांत
तिने काढला नाही त्या मुलीला साधा ओरखडा
तिच्याजवळ ही होता वात्सल्याचा धडा
शेवटी ग्रामस्थांनी केली नीलगायीपासून वैष्णवीची सुटका
बाकी प्रसंग होता खूप हटका
