सैनिक
सैनिक

1 min

250
काळा मातीचा लावून टिळा
उचलला त्यांनी देशभक्तीचा वेिडा
देश रक्षणाचा अंगी त्याचा किडा
मातृभूमीसाठी तो वेडा
थंडी उन्हाचा किती असो पारा
शत्रूला देत नाही थारा
सदैव देतो सीमेवर पहारा
शस्त्र असतात नेहमी तयार
संकट काळी, युद्धाच्यावेळी
करून जीवाची होळी
छातिवर झेलतो गोळी
मातृभूमीसाठी प्राण सोङी
करून प्रयत्नांची पराकाष्ठा
दुष्मनाला शिकवतो धडा
जनतेच्या विश्वासाला नाही जाऊ देत तडा
सैनिकाचा देशाला आहे अभिमान
कर्तृत्वापुढे करते दुनिया सलाम
तिरंगा ची राखता तुम्ही शान
सैनिकांनो तुम्ही आहात महान