STORYMIRROR

Smita Murali

Others

2  

Smita Murali

Others

सावर रे

सावर रे

1 min
440

निसर्गाची ही किमयागारी

अदभुत पसरली सृष्टी सारी

चराचराला नाविण्याची किनार

 घटना घडतात इथे चमत्कारी


कधी निसर्ग करतो बरसात

भरभरुन देतो प्रत्येक हातात

पण जेंव्हा कधी निसर्ग कोपतो

होत्याच नव्हत करतो क्षणात


निसर्गाच्या असतात नाना तऱ्हा 

त्याला कोण घालेल आवर रे

आलेल्या संकटांवर मात करत

मानवा तुच स्वतःला सावर रे


शिकून घे तू आपत्ती व्यवस्थापन 

अवकाळी संकटावर करण्या मात

दूरदृष्टी विना जगशील तू आज

तुझाच भविष्यात होईल रे घात


ओले कधी कोरडे दुष्काळ येतील

भुकंपाचे धक्केही सोसावे लागतील

पडलेल्या भिंती नि खचलेले मन

 तुलाच नव्याने बांधावे लागतील


निसर्गाचे कर काळजीने संवर्धन 

आपत्तीपुढे मानू नको कधी हार

सृष्टी चक्राला समजावून घेवून

बुद्धीने कर या संकटावर प्रहार!!!!!!


Rate this content
Log in