सावली
सावली
लहानपणी मी फिरायची
घरात घेऊन बाहुली
सतत माझ्यावर असायची
आईच्या मायेची सावली......
शाळेत जाण्यासाठी मी
जेव्हा घट्ट पाय रोवली
काळजीने नजर ठेवायची
हळुवार वडिलांची सावली.....
कॉलेजमध्ये जाण्याची
इच्छा मनी भावली
अधून-मधून वावरायची
भावाची भीतीरूपी सावली......
कधी-कधी माझ्या मनाने
निशब्द पणे नाराजी लावली
सदैव आढावा घ्यायची
बहिणीची खोडकर सावली.........
सुख दुःखाच्या लाटा जेव्हा
मनात घरं करून राहीली
तेव्हा मनमोकळे करायला
भेटली मैत्रीरूपी सावली.......
लग्नानंतर घरं , दार , नाती
सारे नवीन मला भासली
तेव्हा साथ दिली समंजसपणे
जोडीदाराची प्रेमरूपी सावली.....
आई-वडिलांच्या आठवणीत
जेव्हा हुरहुर मनाला लागली
विसरायला भाग पाडते
लेकरावरील ममतेची सावली......
