सावित्रीमाई
सावित्रीमाई
1 min
342
तूच आईचा पान्हा, तूच मुक्ताई
अशी थोर होती माझी, सावित्रीमाई
कष्ट केले तू गं आई
धनासाठी नाही
कुबेरही कंगाल ठरला
लाजली कमाई
आजन्म सेवा केली
दीनदलितांची
एकमेव नारी तू गं
माय ललनांची
तूच अमुची रणरागिनी
तूच भिमाई
तूच खरी विद्यादेवी
तूचं जिजाई
तुझेच बळ पंखात भरुनी
आजची उडती विमाने
आठवता रूप तुझे
हृदय भरती अभिमाने
