सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले
1 min
355
माय माउली ज्ञान ज्योत पेटविली
आधी स्वतः गिरवून वसा घेतला फुलेंचा
शाळा मुलींची काढून होता भक्कम पाठिंबा
नाही ती डगमगली
शेण दगडांचा मार अंगावर हो झेलली
शिव्या शाप घेऊनही दिले शिक्षण मुलींना
पैसे देऊन आपले साथ दिली गरजूंना
येता साथीचा आजार आल्या मग मदतीला
सेवा केली अहोरात्र दिला प्राण आहुतीला
मान समाजात त्यांची ठेवू आम्ही सदा ताठ
माय माउली आमची नाही सोडणार पाठ
