सावधान मी
सावधान मी
1 min
365
कोरोना प्रश्न गंभीर खरा,
सावधान मी परी आहे,
स्वतः सुरक्षित जाणून,
दुसऱ्यांसही करू पाहे!
ज्येष्ठ असो, बाल असो,
असो मैत्र किंवा अपरिचित,
संदेश देण्यास तत्पर मी,
काही न घडो अवचित!
सकारात्मक भाव माझे,
पसरावा हा परिमळ,
जग अशाश्वत या क्षणी
परी प्रार्थना माझी सबळ!
