सावध टिप सावज रे
सावध टिप सावज रे
तुझ्या त्या नजरेने का रे
होतात हरिणी त्या घायाळ?
जणू झेपावणारा तू सिंह
हलवितो आपली आयाळ।।१।।
भेदरलेली धावते ती
घरी उपाशी रे पाडस।
एकटी गाठूनीया तिज
फस्त करण्याचे धाडस।।२।।
दमछाक रे झाली तिची
गात्रांत ना उरले त्राण।
दे सोडूनी तिजला रे
जप स्रित्वाचा सम्मान।।३।।
हरिणी नाजूक दिसे ती
किती रे गोंडस तिचे रुप।
कुठे तु श्वापद असे हिंस्र
भेसूर भयावह नि विद्रुप।।४।।
भेदरलेली धावते ती
घरी उपाशी रे पाडस।
एकटी गाठूनीया तीज
फस्त करण्याचे धाडस।।५।।
दमछाक झाली तिची
गात्रांत ना उरले त्राण।
दे सोडूनी तिजला रे
जप स्त्रीत्वाचा सन्मान।।६।।
आवर जरा तुझी रे तू
क्षणिक वासनेची भूक।
अनंत काळची ती माता
फक्त क्षणाची पत्नी मूक।।७।।
हेरताना सावज तू
ठेव चारित्र्याचेच भान।
तुला कशाची रे कमी
माजलेले रे किती श्वान।।८।।
