STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

साऊ ज्ञान आऊ

साऊ ज्ञान आऊ

2 mins
217

साऊ ज्ञान आऊ

 गान किती गाऊ

   विद्या देवता तू

     थोर कार्य साऊ...

कनवाळू ह्रदय

 क्रांती ज्योत पेटी

  घेती मुलींसाठी

   हाती साऊ पाटी.....

छळवाद केला

 नाही सोडी धीर

   मुली शिक्षणाची

     धरी हाती दोर....

तुझ्यामुळे साऊ

   जीवनास अर्थ

    गतकाल जाई

      तुझ्या आधी व्यर्थ....

गिरवले धडे

 साऊ तुझ्यामुळे

   तूचआहे माता

     उद्धारली कुळे....

आम्हा लढण्यास

 शिकवले साऊ

   तुझ किती गुण 

     आता आम्ही गाऊ....

तेजोमय ज्ञान

 दिले तू मुलींना

   तुझ्यामुळे घडली

    अद्दल जनांना...


Rate this content
Log in