साथ तुझी हवी असते
साथ तुझी हवी असते
1 min
323
उनाड एखादी वाट
चुटकीत सर करायला
तिच्यावरून ध्येयाप्रत पोहचायला
फक्त तुझी साथ हवी असते
सुंदर असे स्वप्न डोळ्यात भरून
ते सत्यात उतरवायला
सत्यात उतरवून पूर्णत्वास न्यायला
फक्त तुझी साथ हवी असते
कठीण प्रसंगात न घाबरता
खंबीरपणे उभे राहायला
हार न मानता शेवटपर्यंत लढायला
फक्त तुझी साथ हवी असते
मन नाराज होऊन
परिस्थिती समोर हात टेकताना
पुन्हा सारं काही सावरताना
फक्त तुझी साथ हवी असते...
