सात मे
सात मे
पाचव्या दिवसाची सांज....!
पा य धरणीला टेकेना
च टचट चटके बसत होते
व्या जासह तो
दि वसाढवळ्या सूड उगवत होता...
व टारून डोळे पहात होता
सा धी गोष्ट समजत नाही..?
चि टपाखरूही उन्हात फिरत नाही
सां गितलेलं ऐकता का रे तुला येत नाही?
ज रा नजर वर करून पाहिले
खरोखरच तो रागावला होता
आणि सांगत होता पुन्हा पुन्हा
करू नको गुन्हा पुन्हा पुन्हा
घरातून बाहेर पडू नको
उगाच वर तोंड करून फिरी नको...!
संकट बाबा फार मोठे आहे
तुला वाटते कारे
हे सारे खोटे आहे...?
माझी मलाच लाज वाटली
आणि बाहेर पडलेला पाय
मी गारव्यासाठी घरात घेतला..
म्हटले देवा चुकले
तुझ्या उष्णतेनेच
माझे डोळे उघडले....!
