STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

सात एप्रिल(7)

सात एप्रिल(7)

1 min
274

आज जागतिक आरोग्य दिन

वाजते सर्वत्र आरोग्याची बिन

जो तो आरोग्याचे सल्ले देतो

जो तो आरोग्यासाठी झटतो...

जे आजवर जमले नाही

ते ते आता करावे म्हणतात

चांगले वाईट फक्त सांगणारेच

जाणकार जाणतात....

आता तर कहर झाला

सारा आरोग्य ग्रंथ डोक्यात बसला

म्हंटले देवा हा जन्म रे कसला

वाटते देवा तुझाच डाव फसला...

बंधन मुक्त जीवन जगणे 

हे स्वातंत्र्य प्रिय मानवाचे लक्षण आहे

आरोग्यासाठी बंधनयुक्त राहणे

हे रे देवा तुझे कार्य विलक्षण आहे...

पटले बाबा तुझे

प्रसंग बाका आम्हावरी येता

आरोग्याचा वसा घेतो आम्ही

संकल्प करुनी आजच देवा

सर्वांना शुभेच्छा देताना जाता जाता...!


जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Rate this content
Log in