STORYMIRROR

Raakesh More

Others

4  

Raakesh More

Others

सारे म्हणतात म्हणून

सारे म्हणतात म्हणून

1 min
428

कशाला त्रास भोगतोस 

प्रेमाचा अर्थ जाणण्याचा 

सारे म्हणतात म्हणून

तेच सत्य मानण्याचा ||0||


आहेस दूर या झंझटीपासून 

दूरच तू राहिलेलं बरं 

दुरून डोंगर साजरे म्हणून 

दुरूनच पाहिलेलं बरं 

कशाला छंद नस्ती आफत

जवळ आणण्याचा 

सारे म्हणतात म्हणून 

तेच सत्य मानण्याचा ||1||


दुनिया ही फसवी आहे 

हृदय तोडलं जातं इथे 

प्रेमाच्या या रस्त्यावर 

मध्येच सोडलं जातं इथे 

सोड विचार अशी स्वतःची 

कबर खणण्याचा 

सारे म्हणतात म्हणून 

तेच सत्य मानण्याचा ||2||


मित्र आहेस म्हणून सांगतो 

पारख जरा जपून कर 

प्रेम करताना जरा 

हृदयात थोडं लपून कर 

सोड वेड असं स्वतःला 

मजनूत गणण्याचा 

सारे म्हणतात म्हणून 

तेच सत्य मानण्याचा ||3||


चार दिवस आनंदाचे 

नंतर रडणं अटळ आहे 

रोमँटिक दुनियेच्या अंती 

तडफडणं अटळ आहे 

सोड लक्ष्य प्रेमात नंबर 

वन बनण्याचा 

सारे म्हणतात म्हणून 

तेच सत्य मानण्याचा ||4||


Rate this content
Log in