सारा आसमंत कवेत माझ्या
सारा आसमंत कवेत माझ्या
1 min
250
मी
नव्या युगाची
नारी आहे पद्मजा
सारा आसमंत कवेत माझ्या.
स्त्री
अनमोल रत्न
शक्ती आधुनिक जगाची
अद्वितीय निर्मिती अखंड विश्वाची.
स्त्री
आदिशक्ती, आदिमाया
विश्वरुपिणी, जगदंबा, कालिका
प्रत्येक घरातील प्रेमळ बालिका.
स्त्रीची
आहेत देवा
सगळीकडे रूपे अनेक
तरी जन्मदात्री आहे एक.
स्त्री
अनमोल ठेवा
स्त्रीच्या असण्याने सर्वकाही
तिच्या नसण्याने जगही नाही.
