STORYMIRROR

Sushama Gangulwar

Children Stories Others

3  

Sushama Gangulwar

Children Stories Others

सांजवेळी

सांजवेळी

1 min
645


सांजवेळी खेळे पोरं 

मनसोक्त या अंगणी 

चील्ली पील्ली दोस्तासवे 

खेळ कसे ? हो रंगली....


पाहती सारे चांदणे 

मोजूयात का रे तारे 

कळेना कसे मोजावे ? 

आपलेच खेळ बरे......


अशा या कातरवेळी 

काजवे उजेड दावी  

पकडण्या काजव्याला 

लेकरे ही पैज लावी......


झाली दिवा बत्ती वेळ 

आई पोरा हाक देई 

हात जोडून उभे पुढे 

सुरात प्रार्थना गाई......


Rate this content
Log in