सांजवेळ
सांजवेळ
1 min
12.4K
घराकडे चल आता सांजवेळ झाली.
त्या डोंगराआड मित्र घेतो बुडी.
बघ बघ दिशा कशी तांबडी झाली.
घराकडे चल आता सांजवेळ झाली.
गायी बघ चालल्या, वासरे गोठ्यात बांधली,
दुधे अमृते शड भरले, हंबरती गायी.
घराकडे चल आता सांजवेळ झाली.
पक्षी सारे घरट्यात आले,
झाकड बघ पडली.
सांजवेळ झाली ही सांजवेळ झाली.
घराकडे चल आता सांजवेळ झाली.
शिवार शांत झाला सारा,वाट
अस्पष्ट झाली.
घराकडे चल आता सांजवेळ झाली.
हात चाले,पाय चाले, काया सारी थकली.
दिप लाव देवापुढे, शांत वेळ झाली.
निद्रा घेऊन फुलली पहाट,
बघ,पुन्हा प्रभात झाली.
घराकडे चल आता सांजवेळ झाली.
