सांजवेळ
सांजवेळ

1 min

24
ओल्या सांजवेळी, पक्षी, घरट्यात परतले,
वाट पाही नेत्र ज्याची, वाजे न त्याची पावले!
घाली पिंगा वा-यावर, मेघ केशरी गगनी,
दूर प्रवासी, न येई कळ काहूरल्या मनी!
पापणीच्या काठातून, अश्रू वर्षा बरसते,
चिंब झाल्या नदीकाठी, रव पाकोळी करते!
निशा सांगे, संध्याराणी, माझा निरोप देशील?
शूक्रतारा उगवला, चंद्रा, माघारी येशील?