सांजधारा
सांजधारा
1 min
236
दिवस निघून गेला
सांज रेंगाळून आली
क्षण एक असा ही ज्यात
त्यात तुझी आठवण नाही….
भेट आपली पहिली
लाख लाख आठविते
रूप धुक्यात तुझे
कण कण साठविते…
असा भरून आला उर
जसा वाळीव भरावा
हूरहूर अशी जसा
गंध राणी पसरावा ….
ऐक ना अबोध मनाची
अनाकलनीय भाषा
कसे गुंतले हे गूढ
बघ तळतावरच्या रेषा ….
