STORYMIRROR

Pratibha Bilgi

Others

4  

Pratibha Bilgi

Others

सांज सुंदर स्वप्नांची

सांज सुंदर स्वप्नांची

1 min
189


थांब ना सजना अजून जरासा 

कळीही लागली आता उमलायला

सुगंधीत वारा फुलांचा नजारा

पुरे प्रीत ही जागवायला


हातांचा गोफ मनाचा मेळ

जवळीक ही फुलवायला

वेळ दे ना मला अजून जरासा

हृदयातील भावना कळवायला


सांज ही सुंदर स्वप्नांची

सूर्य ही लागला मावळायला

हृदयाची धडधड ऐक ना जरा

तुझेच नाव येईल ऐकायला


जवळ तू ये ना जरा

श्वास हा लागला बहरायला

हळूच कर प्रेमाची कुजबुज

न कळू दे कोणाला


तू पहिले प्रेम माझिये

तूच आखरी या जीवनाला

एक शेवटची तमन्ना प्रिया

घे सामावूनी तुझ्यात मला....... 



Rate this content
Log in