STORYMIRROR

Chaitali Ganu

Others

3  

Chaitali Ganu

Others

सांगणं न सांगणं

सांगणं न सांगणं

1 min
138

खरं तर सांगण्यासारखं बरंच काही आहे

न सांगण्याकडेही

पण सांगावं की नाही

हे काही दोघात ठरत नाही


एक म्हणतं सांग

दुसरं म्हणत वाट पहा

पण प्रश्नाची की उत्तराची?

हे खास अजून कळत नाही


तसं फारसं कठीण नाही आहे 

सांगून टाकणं

पण मग फारसं की कठीण

तेच नेमकं लक्षात येत नाही

न सांगण्याकडे न सांगण्याची

भरपूर कारणं आहेत


पण सांगण्याला दुसरा पर्यायच नाही

मग काय करायचं?

एकदाचं सांगायचं

नाही सांगायचं

की सोडून द्यायचं हेही

नशीबावरच

सांगण्या न सांगण्याच्या??

हेच अजून कळून वळत नाही....


Rate this content
Log in